Breaking
ब्रेकिंग

प्रश्न दिसतोय छोटा पण परिणाम मात्र खूप गंभीर होऊ शकतात……?

0 1 0 3 3 0

प्रश्न दिसतोय छोटा पण परिणाम मात्र खूप गंभीर होऊ शकतात……?

प्रश्न दिसतोय छोटा पण परिणाम मात्र खूप गंभीर होऊ शकतात……?

कोपरगाव :- प्रतिनिधी 

नुकताच गोदावरी नदीला पूर येऊन गेला, गोदावरी नदीकडून बेट भागाकडे जाणार रस्ता या रस्त्यालगतच कोपरगाव तालुक्यातील एक मोठे महाविद्यालय
आहे
या ठिकाणाहून जाणाऱ्या रस्त्याला तत्कालीन कोपरगाव नगर परिषदेचे नगराध्यक्ष श्री वहाडणे व सर्व नगरसेवक यांनी त्यांच्या शेवटच्या जनरल बोर्ड मिटिंग मध्ये या रस्त्याला परम सद्गुरू श्री शुक्राचार्य महाराज पालखी मार्ग असे नामकरणाचा ठराव घेतलेला आहे अशा या रस्त्याला *गोदावरी नदीवरील संजीवनी घाटापासून ते तांडेल बंगल्याजवळील नाव धक्क्यापर्यंत भेग पडलेली आहे*

हा रस्ता बेट भागाला तसेच के जे सोमय्या महाविद्यालयाला व पंचक्रोशीला जोडणारा रस्ता आहे,
गोदावरी नदी व रस्ता यांच्यामधील संरक्षण भिंतीला किंवा पिचिंगला हे तडे गेलेले आहे,
उद्याच्या भविष्यात मोठ्या प्रश्नाची ही नांदी आहे याकडे कोपरगाव नगर परिषदेने तसेच लोकप्रतिनिधी साहेबांनी व प्रशासनाने गांभीर्यपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे,
ही संरक्षण भिंत भविष्यात जर ढासळली तर खूप मोठा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे नागरिकांसह विद्यार्थ्यांचे मोठं नुकसान यामुळे होऊ शकते याची दखल प्रशासनानं घ्यावी,
निसर्ग कोपल्यानंतर काय होऊ शकतं याची आपण सर्वजण कल्पना करू शकता परंतु याच निसर्गानं तुम्हाला आम्हाला व प्रशासनाला सावध केलेले आहे

वेळ असतानाच या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देऊन उपाययोजना करावी इतकीच विनंती सर्व नागरिकांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या वतीने प्रशासनाला करत आहोत
या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे उद्या होऊ घातलेल्या संकटाला सावरण्याची संधी व इशारा निसर्गानेच आपल्याला दिलेला आहे याची गांभीर्याने दखल घ्यावी एवढीच माफक इच्छा व विनंती.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

गोदावरी शुक्राचार्य

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 0 3 3 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे