१२ ऑगस्टला सकाळी 9 वा शुक्राचार्य महाराज जन्मोत्सवाचा आणि शिवपार्वती विवाह सोहळयाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
१२ ऑगस्टला सकाळी 9 वा.शुक्राचार्य महाराज जन्मोत्सवाचा आणि शिवपार्वती विवाह सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
कोपरगाव :- प्रतिनिधी
संजीवनी मंत्राचे उगमस्थान असलेले पवित्र परम सद्गुरु शुक्राचार्य महाराज मंदिर जिथे शुभ कार्य करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा मुहूर्त पाहवा लागत नाही असे जगप्रसिद्ध असलेल्या एकमेव श्री क्षेत्र बेट देवस्थान मध्ये हिंदू धर्मातील पवित्र श्रावण महिन्यात येणाऱ्या श्रावण शुद्ध अष्टमीला स्वाती नक्षत्रात म्हणजेच सोमवारी १२ ऑगस्ट रोजी भव्य दिव्य परम सद्गुरु शुक्राचार्य महाराज जन्मोत्सव व शिवपार्वती विवाह सोहळा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड, सचिव संजीव कुलकर्णी,खजिनदार गजानन कोराळकर, सदस्य सुहास कुलकर्णी, हेमंत पटवर्धन, मंदिर प्रमुख सचिन परदेशी, उपमंदिर प्रमुख प्रसाद पर्हे सदस्य संजय वडांगळे, आदिनाथ ढाकणे, अरुण जोशी, विशाल राऊत, बाळासाहेब लकारे, सुजित वरखेडे, विलास आव्हाड, दत्तात्रय सावंत, महेंद्र नाईकवाडे, मुन्ना आव्हाड, बाळासाहेब गाडे, विजय रोहम, दिलीप सांगळे, विकास शर्मा, भागचंद रुईकर, मधुकर साखरे व्यवस्थापक राजाराम पावरा आदींनी दिली आहे.
सोमवार दि १२ ऑगस्ट रोजी आमदार आशुतोषदादा काळे त्यांच्या पत्नी चैतालीताई काळे, हैदराबाद येथील शुक्रभक्त रविराज शेखर या मान्यवरांच्या उपस्थितीत शुक्राचार्य महाराजांची पालखी मिरवणूक होणार असून त्यानंतर उपस्थित सर्व भाविक भक्तांना शुक्राचार्य महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे तरी जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
तरी या भव्यदिव्य सोहळ्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन
जय गोदामाई……..!
जय त्र्यंबकराज……!!
जय शुक्राचार्य…….!!!