टेके पाटील ट्रस्ट संचालित “माणुसकीच्या भिंती” च्या कपड्यांची अनाथ व वृद्ध आश्रमातील गरजवंतांना दिली ऊब…!

टेके पाटील ट्रस्ट संचालित “माणुसकीच्या भिंती” च्या कपड्यांची अनाथ व वृद्ध आश्रमातील गरजवंतांना दिली ऊब…!
कोपरगाव :- प्रतिनिधी
*कोपरगाव तालुक्यातील वारी येथील सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या राहुल (दादा) मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित “माणुसकीची भिंत” या उपक्रमांतर्गत गेल्या काही महिन्यांमध्ये दातृत्व जपणाऱ्या अनेक मान्यवरांनी आपल्याकडील लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वच प्रकारच्या चांगल्या अवस्थेतील कपड्यांची ऊब या माणुसकीच्या भिंतीला दिली होती. त्यातून मोठ्या प्रमाणात सर्वच प्रकारचे कपडे संकलित झाले होते. गावातील गरजवंतांना जेवढी मदत करता येईल तेवढी होतच होती. परंतु, कपडे जास्त प्रमाणात उपलब्ध झाले होते. त्यावर चासनळी येथील आमचे मामाश्री कैलास हरिराम चांदगुडे पाटील यांच्या आवाहनातून लासलगाव (जि. नाशिक) येथील अनाथांचे माता पिता स्वामी वासुदेवनंदगिरी गुरु मौनगिरीजी बहुरूपी महाराज व दिलीप महाराज गुंजाळ सर यांच्या परिश्रमातून 2003 पासून सुरू असलेल्या “जय जनार्दन अनाथ व वृद्धाश्रम” येथील 100 पेक्षा जास्त अनाथ चिमुकले, तरुण मुलंमुली, महिला, वयोवृद्ध आजी-आजोबा यांना 200 पेक्षा अधिक सर्व प्रकारचे वस्त्र गुरुवारी ( दि.12) प्रत्यक्षात जाऊन भेट देण्यात आले. यावेळी चिमुकल्यांसह उपस्थित सर्वांच्याच चेहऱ्यावरील आनंद हा अंतरमनाला प्रफुल्लित करणारा होता.*
*यावेळी 105 मुलींचे व 61 मुलांचे लग्न लावणारा, 61 मुलामुलींना नोकरीला लावणारा, त्यातील एका मुलीला पीएसआय, एक मुलगी डॉक्टर, बारा मुले देशसेवेत समर्पित करणारा, त्याचबरोबर शिक्षक, कीर्तनकार असे अवलिये घडवणारा बाप म्हणजेच दिलीप बाबुराव गुंजाळ सर यांच्याशी संवाद साधताना मी निशब्द होतो. यावेळी माझ्यासमवेत कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाशराव गोर्डे पाटील, वारीचे प्रथम लोकनियुक्त सरपंच तथा स्वयंसेवक सतीशराव कानडे, वारी पोस्ट कार्यालयाचे पोस्टमास्तर तथा स्वयंसेवक संजय कवाडे, चासनळी येथील प्रगतशील शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते तथा आमचे मामाश्री कैलासराव चांदगुडे पाटील, मोर्विस येथील युवा उद्योजक योगेशराव सोनवणे, लहान बंधू स्वप्निल टेके पाटील उपस्थित होते.*