निर्मलवारी अभियानात संजीवनी युनिव्हर्सिटीतील BBA अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा सहभाग
निर्मलवारी अभियानात संजीवनी युनिव्हर्सिटीतील BBA अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा सहभाग
निर्मलवारी अभियानात संजीवनी युनिव्हर्सिटीतील BBA अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा सहभाग
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी लाखो भक्त पायी दिंडी (वारी) करत जातात. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्रंबकेश्वर येथून निघणारी *संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज पालखी* अहिल्यानगर जिल्ह्यात 16 जून रोजी पारेगाव या ठिकाणी दाखल झाली होती. या ठिकाणी पालखीचा मुक्काम होता. तसेच मंगळवार दिनांक 17 जून रोजी राहता तालुक्यातील गोगलगाव या ठिकाणी पालखीचा मुक्काम होता.
गोगलगाव या ठिकाणी संजीवनी युनिव्हर्सिटीच्या BBA अभ्यासक्रमाच्या 30 विद्यार्थ्यांनी नाशिक चे सुप्रसिद्ध अस्थिरोग विशेष तज्ञ डॉ. भरत केळकर यांच्या समन्वयाने व संजीवनीचे प्रा. सुधांशू भट यांच्या मार्गदर्शनाखाली निर्मल वारी या अभियानात प्रत्यक्ष सहभाग नोंदवला.
*निर्मल वारी अभियान हे वारी मार्गाच्या मुक्कामाच्या ठिकाणी राबविले जाते. या अभियानाला 2015 पासून सुरुवात झाली*. या अभियाना अंतर्गत वारी ज्या ठिकाणी मुक्काम करते त्या ठिकाणी काही फिरत्या शौचालयांची उभारणी केली जाते. व वारकऱ्यांना आग्रह केला जातो की त्यांनी शौचालयांचा वापर करावा. एका ठिकाणचा मुक्काम संपल्यानंतर ही सगळी शौचालय पुन्हा दुसऱ्या गावांमध्ये नेली जातात. म्हणजे वारकरी दुसऱ्या गावात जाऊन पोहोचेपर्यंत ही सगळी व्यवस्था त्या गावात पोहोचलेली असते. या अगोदर अशा विविध मुक्कामांच्या ठिकाणी वारकरी आपला प्रातर्विधी उघड्या जागेवर करत असत, त्यामुळे वारी गावातून गेल्यानंतर त्या ठिकाणी अस्वच्छता, रोगराई वाढत असे. त्यामुळे गावातील ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहत असे. त्यावर उपाय म्हणून निर्मल वारी अभियान राबविण्यात येते.
या अभियानांतर्गत वारकऱ्यांनी शौचालयांचा वापर करावा असा आग्रह स्वयंसेवकांमार्फत केला जातो. या फिरत्या शौचालयांच्या ठिकाणी वापराचे पाणी ,वीज व्यवस्था केली जाते. अशा प्रकारची व्यवस्था राहता तालुक्यातील गोगलगाव या ठिकाणी सुद्धा केलेली होती. या ठिकाणी संजीवनी युनिव्हर्सिटीचे बीबीए अभ्यासक्रमाचे हेड श्री. सुधांशू भट सर व विद्यार्थी यांनी या अभियानात सहभागी होत, वारकऱ्यांना शौचालयाचा वापर करावा असे आवाहन केले. तसेच या ठिकाणी या सर्व टीमने सर्वेक्षण केले. येथील वारकऱ्यांशी संवाद साधत ,वारीची परंपरा, वारीचे नियोजन व व्यवस्था, वारकऱ्यांचे आरोग्य, गावातील स्वच्छता अशा विविध घटकांचा देखील अभ्यास केला.
या निर्मल वारी अभियानाच्या यशस्वीतेसाठी शासनाबरोबरच समाजातील विविध सेवाभावी संस्था यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.
जय गोदामाई जय त्र्यंबकराज जय शुक्राचार्य




