अखंड संघर्ष आणि जिद्दीच्या बळावर चासनळीची कन्या पल्लवी आहेर यूपीएससी ‘CAPF’ परीक्षेत देशात ९५ वी असिस्टंट कमांडंट पदाला गवसणी

🏆 अखंड संघर्ष आणि जिद्दीच्या बळावर चासनळीची कन्या पल्लवी आहेर यूपीएससी ‘CAPF’ परीक्षेत देशात ९५ वी
असिस्टंट कमांडंट पदाला गवसणी*🏆
✍️ महेश थोरात✍️
*ध्येय जितके मोठे, संघर्ष तितकाच कठोर पण सातत्य आणि संयम असेल तर यश निश्चित* या उक्तीचा प्रत्यय कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील कन्या कु. पल्लवी बाळासाहेब आहेर हिने आणून दिला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (UPSC) घेण्यात आलेल्या *’सेंट्रल आर्म्स पोलीस फोर्सेस’ (CAPF) २०२५ च्या परीक्षेत संपूर्ण भारतात ९५ वा रँक मिळवत तिची असिस्टंट कमांडंट (Assistant Commandant) या वर्ग-१ च्या अधिकारी पदावर निवड झाली आहे. तिने मिळवलेल्या या उत्तुंग यशामुळे संपूर्ण कोपरगाव तालुका व अहिल्यानगर जिल्ह्याचे नाव देशभरात उज्ज्वल झाले आहे.
मायेचे छत्र हरपले पण आईच्या कष्टाने दिले पंखांना बळ
💯*आईने परिस्थितीसमोर हार मानली नाही आणि पल्लवींनीही स्वप्नांसमोर तडजोड केली नाही.*
पल्लवीचा हा यशोमार्ग अत्यंत संघर्षाचा आणि प्रेरणादायी राहिला आहे. लहानपणीच पित्याचे छत्र हरपल्यामुळे तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. मात्र, खचून न जाता *तिच्या आईने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत घरची शेती सांभाळत पल्लवी, तिची मोठी बहीण आणि लहान भाऊ अशा तिन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी खंबीरपणे पेलली. आईचे कष्ट आणि तिने दिलेला विश्वास हीच पल्लवीच्या यशाची खरी ऊर्जा ठरली.*
🏆पल्लवीचे पदवीपर्यंतचे शिक्षण कोपरगाव येथील एस.एस. जी. एम. महाविद्यालयात भौतिकशास्त्र विषयात पूर्ण झाले. कॉलेजमध्ये असतानाच तिने एनसीसी NCC मध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. तिच्या शिस्त आणि पराक्रमाच्या बळावर *दिल्ली येथील प्रजासत्ताक दिन परेड Republic Day Parade मध्ये सहभागी होण्याचा बहुमान तिने पटकावला होता.* पदवीनंतर तिने पुण्यातील प्रतिष्ठित फर्ग्युसन कॉलेज Fergusson College येथून M.Sc. पूर्ण केले आणि त्यानंतर स्पर्धा परीक्षांच्या तयारीला सुरुवात केली.
📖*अपयशाने खचली नाही ५ वर्षांचे सातत्य अन् जिद्द ठरली निर्णायक* 📖
M.Sc. नंतर पल्लवीने संरक्षण दलातील अधिकारी पदासाठी अनेक SSB आणि AFSB लेखी परीक्षा व मुलाखती दिल्या. अनेकदा यशाने अवघ्या काही गुणांनी हुलकावणी दिली, अपयश आले परंतु तिने धीर सोडला नाही. *नेमेचि येते मग पावसाळा* याप्रमाणे तिने अपयशातून धडे घेत पुन्हा नव्या जोमाने अभ्यास सुरू केला.
या पाच वर्षांच्या काळात *अनेकदा निराशा आली असेल, अडथळे आले असतील, अपयशाचे धक्के बसले असतील पण ध्येय सोडण्याचा विचार त्यांनी मनात येऊ दिला नाही.*
🎯*प्रत्येक अपयशानंतर त्यांनी पुन्हा नव्या जोमाने अभ्यासाला सुरुवात केली. आपल्या तयारीतील उणिवा शोधल्या, त्यावर काम केले आणि स्वतःला अधिक सक्षम बनवले.*
🏆*मार्गदर्शनासाठी तिने दिल्ली गाठले आणि अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने अभ्यास केला. *सुमारे ५ वर्षांचे अविरत सातत्य, संयम आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर तिने अखेर UPSC CAPF परीक्षेत ऑल इंडिया ९५ वा रँक मिळवून आपले अधिकारी बनण्याचे स्वप्न साकार केले.*
📚 *संकटांवर मात करून ध्येयाकडे वाटचाल करणाऱ्यांच्या पावलांना यशाची दिशा आपोआप सापडते*
पल्लवी आहेर हिचे हे यश ग्रामीण भागातील विशेषतः प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करणाऱ्या हजारो विद्यार्थिनींसाठी आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे.
*आजच्या विद्यार्थ्यांनी पल्लवी आहेर यांच्या यशाकडे केवळ एका यशोगाथेच्या रूपात न पाहता, त्यातून सातत्य, संयम आणि अपयशावर मात करण्याची कला शिकण्याची गरज आहे.*
📚📖📚📖📚🏆📚🏆
✍️ महेश थोरात✍️
कोपरगाव नगरपरिषद संचालित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय




