*25 जून 2025 रोजी समता चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सर्वात तरुण योगशिक्षक चि.प्रज्वल आदिनाथ ढाकणे याला योग शिक्षक पुरस्कार देण्यात आला देणाऱ्या घेणाऱ्या दोघांचेही अभिनंदन…!*
*…..हार्दिक अभिनंदन….*
25 जून 2025 रोजी समता चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सर्वात तरुण योगशिक्षक चि.प्रज्वल आदिनाथ ढाकणे याला योग शिक्षक पुरस्कार देण्यात आला देणाऱ्या घेणाऱ्या दोघांचेही अभिनंदन…!

आज कोपरगाव पंचक्रोशीत प्रज्वल ढाकणे सर्वात तरुण उत्साही प्रशिक्षक म्हणून प्रसिद्ध झाला आहे. शिक्षण बी.एससी पर्यंत झाले आहे.चार वेळा राष्ट्रीय पातळीवर त्यांनी योग विद्येचे पारितोषिक मिळवले राष्ट्रीय पातळीवरच्या खेलो इंडिया या स्पर्धेत सुद्धा त्याला पारितोषिक मिळाले. परदेशात (थायलंड बँकॉक) येथे त्याला दोन गोल्ड मेडल मिळाले. विसाव्या वर्षी प्रज्वलने गेले साता समुद्रा पलीकडे भारताचा झेंडा रोवला याचा कोपरगावकरांना आनंद व अभिमान आहे. योग शिक्षकच नाहीतर अनेक सामाजिक,धार्मिक कार्य त्याचा पुढाकार असतो. उभ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध गोदामाई प्रतिष्ठानच्या सचिव पदी तो काम करतो. गेले 320 आठवडे या गोदामाची सेवा करीत आहे. असा हर-हुनरी प्रज्वल कोपरगावकरा मध्ये लोकप्रिय झाला आहे. त्याची बहीण वैष्णवी सुद्धा ही योग शिक्षिका आहे.*
*त्याचे पिताश्री श्री.आदिनाथ ढाकणे निरंतर गोदामाई प्रतिष्ठानच्या वतीने सेवा करतात.अनेक चित्रपटात त्यांच्या भूमिका गाजल्या आहे. प्रसिद्ध सिनेअभिनेता.चिन्मय उदगीरकर आदिनाथचा जिवलग मित्र आहे. डॉक्टर राजेंद्र सिंग यांच्या नेतृत्वाखाली आदिनाथ गोदामाई प्रतिष्ठानचे काम करीत आहे. आदिनाथला राज्यात तसेच आंतरराज्य मध्ये अनेक पुरस्कार मिळाले आहे. त्यांची धर्मपत्नी सौ.मंगल ढाकणे ही सुद्धा त्यांच्या कार्यात मदत करते.*
*अशा आमच्या प्रज्वल ढाकणे ला परमेश्वर उदंड व निरोगी आयुष्य देवो त्याच्या सहवासात कोपरगावची जनता नक्कीच निरोगी होईल अस वाटत.पुनच्छ एकदा अभिनंदन…!*

*नारायणशेठ अग्रवाल, कोपरगांव.*
*मो 9822630330*




