Breaking
ब्रेकिंग

वाढते जलप्रदुषणाचा धोका लक्षात घेता नगरपरिषदेने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित करावा……इंडियन मेडिकल असोसिएशन

0 0 4 7 8 9

वाढते जलप्रदुषणाचा धोका लक्षात घेता नगरपरिषदेने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित करावा……इंडियन मेडिकल असोसिएशन

कोपरगाव :- प्रतिनिधी 

कोपरगांव ; शहर व तालुक्यात अनेक व्यवसाय,उद्योगधंदे व वैद्यकीय आस्थापना कार्यरत असून यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर होतो,यामधून निघणारे सांडपाणी हे कोणतीही प्रक्रिया न करता गोदावरी नदीमध्ये सोडले जाते यामुळे जल प्रदुषण होवून नैर्सगिक संपत्तीचा होणारा ऱ्हास,निसर्गाचा ढासळलेला समतोलामुळे पाण्याचे स्त्रोत कमी होत चालेले आहे.यावर उपाय म्हणून व्यवसाय,उद्योग यामधून निघणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी कोपरगांव नगरपरिषदेने सांडपाणी व्यवस्थापन प्रक्रिया प्रकल्प उभारून तो कार्यान्वित करावा अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशन चे अध्यक्ष डॉ.मयुर तिरमखे व सचिव डॉ.संकेत मुळे यांनी मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.
सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पामुळे पाण्याचा पुनर्वापर वाढून अपव्यय कमी करता येईल,प्रक्रिया करून सांडपाणी नदीमध्येसोडले तर नैसर्गिक स्त्रोत प्रदुषणापासून वाचवण्यास मदत होईल,प्रक्रिया केलेले पाणी पुनर्भरण करून भूजल पातळी वाढवण्यास मदत होईल,हा प्रकल्प कार्यान्वित केल्यास वैद्यकीय व्यवसायिकांना महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अटी व शर्तींचे तंतोतंत पालन करून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विविध मान्यता मिळवण्यास मदत होईल असे पुढे निवेदनात म्हटले आहे.सांडपाणी प्रकिया प्रकल्प उभारण्यासाठी प्रशासकीय स्तरावर योग्य तो पाठपुरावा केला जाईल असे आश्वासन मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी पदाधिकारी यांना दिले.
यावेळी डॉ.मयुर तिरमखे,डॉ.संकेत मुळे,डॉ.अजेय गर्जे, ,डॉ.योगेश लाडे,डॉ.अतिश काळे,डॉ.अमोल अजमेरे,डॉ.संजय उंबरकर,डॉ.पंकज बूब, डॉ.संतोष तिरमखे डॉ.योगेश बनकर,डॉ.हर्षद आढाव,डॉ.महेश जाधव, डॉ.वरद गर्जे, डॉ.अमित नाईकवाडे,डॉ.मयुर जोर्वेकर,डॉ,जितेंद्र रणदिवे आदी उपस्थित होते.

!! जय गोदामाई जय त्र्यंबकराज जय शुक्राचार्य !!

5/5 - (1 vote)

गोदावरी शुक्राचार्य

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 4 7 8 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे