Breaking
ब्रेकिंग

*दक्षिण गोदावरी माता मंदिराकरीता जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी*

0 1 0 3 3 0

गोदामाई प्रतिष्ठाणचे कोपरगाव नगरपरीषदेला पत्र…

*दक्षिण गोदावरी माता मंदिराकरीता जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी*

कोपरगाव/प्रतिनिधी

गोदावरी नदीच्या कडेला बेट भागात गोदावरी मातेचे मदिराकरीता जागा उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी
गोदामाई प्रतिष्ठाण ट्रस्टचे अध्यक्ष आजिनाथ ढाकणे यांनी कोपरगाव नगरपरीषदेकडे केली आहे.

कोपरगाव नगरपरीषदेचे मुख्याधिकारी यांना दिलेल्या पत्रात श्री.ढाकणे यांनी म्हंटले आहे की, कोपरगाव शहरातुन गोदावरी नदी ही पुर्व दक्षिण व पूर्व उत्तर पश्चिम वाहीनी झालेली आहे. तसेच कोपरगावास फार मोठा पौराणिक इतिहास आहे. कोपरगाव बेट भागात जगातील एकमेव दैत्यगुरु शुक्राचार्य मंदिर, संजीवन मंत्र पार, कचेश्वर व त्र्यबंकेश्वर मंदिर, प. पू. जनार्दन स्वामी महाराज, प. पू. रामदासीबाबा यांचे समाधी स्थळ आहे. शहरातील खंडोबा मदिराकरीता श्री. साईबाबा यांनी तपस्या केलेली तपोभूमी आहे. त्यामुळे २०२७ मध्ये येणाऱ्या कुंभमेळयाचे वेळी याठिकाणी देखील भाविकांची मोठी गर्दी असते. त्यामुळे गोदावरी नदीच्या कडेला बेट भागात गोदावरी मातेचे मदिराकरीता जागा उपलब्ध करुन द्यावी.
मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस ,पालकमंत्री
राधाकृष्ण विखे पाटील, आ.आशुतोषदादा काळे,नाशिक विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व
तहसिलदार कोपरगाव यांना ही या निवेदनाच्या प्रति पाठविण्यात आल्या आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

गोदावरी शुक्राचार्य

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 0 3 3 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे