Breaking
ब्रेकिंग

कोपरगांव शहराच्या १३१.२४ कोटींच्या पाणी योजनेची शासकिय चौकशी सुरु होणार :- राजेश मंटाला

0 1 0 7 5 0

कोपरगांव शहराच्या १३१.२४ कोटींच्या पाणी योजनेची शासकिय चौकशी सुरु होणार … राजेश मंटाला

🙏नमस्कार 🙏

मी दिनांक २७/११/२५ रोजी
नगरपरिषद प्रशासन संचनालय , मुंबई येथे कोपरगांव शहराच्या १३१.२४ कोटींच्या पाणीयोजनेच्या कामामध्ये असलेल्या अनियिमतता , योजनेचे अपूर्ण असलेले काम , तसेच १ ते ४ तळ्यांचे कामे पूर्ण केले नाही तसेच इतका मोठा निधी खर्च करूनही दररोज पाणी मिळत नाही , याबाबत आपल्या कार्यालयामार्फत चौकशी करावी असे पत्र दिले होते .


त्या नुसार नगरपरिषद संचनालयाने नासिक येथे विभागिय आयुक्त कार्यालय यांना योजनेच्या चौकशी करण्यासाठी समिती नेमून चौकशी करावी व अहवाल सादर करावा असे पत्र दिले होते .
त्यानुसार शुक्रवार दि.२४/४/२६ रोजी चौकशी समिती कोपरगांव नगरपालिकेत येणार आहे . मी व माझे सहकारी नगरपालिकेत अनेक हेलपाटे मारून RTI मध्ये मिळवलेले , आमच्याकडे असलेले कागदपत्रे त्यांच्या समोर सादर करू .
दररोज, स्वच्छ , नियमित पाणी मिळणे हा आपला अधिकार आहे . त्यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढणार , आपली साथ , सहकार्य, आशीर्वाद पाठीशी असू द्या .

🙏धन्यवाद🙏

आ. नम्र
राजेश बन्सीलाल मंटाला व सहकारी
कोपरगांव

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

गोदावरी शुक्राचार्य

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 0 7 5 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे