एका हाडांचा शिक्षक अनंतात विलीन :- प्रा राहुल बालवे

एका हाडांचा शिक्षक अनंतात विलीन :- प्रा राहुल बालवे
आज सकाळी प्राचार्य वर्पे साहेबांच्या निधनाची वार्ता 😔 बहिणीकडून कळाली व संपूर्ण बालवे परिवाराला प्रचंड दुःख झाले.
सोमय्याचे त्रिकुट ( G.G वर्पे D.L बालवे D.S शेळके ) आज काळाच्या पडदयाआड गेले.प्राचार्य वर्पे व बालवे परिवार यांचे १९७० पासून घनिष्ठ संबंध होते. सरांचे नेहमी घरी येणे असायचे. आई ने केलेली बोंबील चटणीचे सरांनी केलेले कौतुक आज मला व आईला आठवले.

एक हाडाचे शिक्षक कसे असावे तर ते सरांकडे पाहिल्यावर लक्षात यायचे. अर्थशास्त्र सारखा रुक्ष विषय ते अतिशय सोप्या भाषेत आपल्या वकृत्वाच्या जोरावर विद्यार्थ्यांनवर बिंबवत असे.
१९९१ ते १९९६ हा सरांचा प्राचार्य म्हणून कार्यकाळ अतिशय धडाडीचा होता. एक कडक शिस्तीचे, रुबाबदार प्राचार्य म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला. सरांना विद्यार्थी क्लास बुडवून बाहेर फिरलेला, ग्राऊंडवर बसलेला अजिबात आवडत नसे.. कॉलेज ग्राउंडला त्यावेळेस तार कुंपण होते सर जर ग्राउंड वर आले तर पळून जाताना विद्यार्थ्यांनचे शर्ट फाटताना मी अनेकदा पहिले. इतका सरांचा धाक विदयार्थ्यांवर होता.

त्यावेळेस कॉलेजचा पहिला ब्रेक सकाळी (१०.१५) झाला की बाहेर गावचे विदयार्थी, विदयार्थीनी घरी जायला निघायचे. सर लगेच स्कुटरला किक मारून विदयार्थीनीना लहान पुलावरून परत कॉलेजला घेऊन यायचे. सहाजिकच विद्यार्थी पण मागून यायचे.
बेट, मोहनीराज नगर, व पंचक्रोशीतील अनेक धुरीण प्राचार्य जोपर्यंत कॉलेज मद्ये आहे तोपर्यंत एकतर राजा च्या कॅन्टीनला नाही तर अण्णाच्या कॅन्टीनला चडीचूप बसलेले मी पहिले. सरांची स्कुटर लहान पुलावर गेली की हे बाहेर पडत. इतका सरांचा त्यावेळी विदयार्थ्यांनवऱ धाक होता.
सरांचे वक्तृत्व अतिशय प्रभावी होते त्यावेळचे महाराष्ट्र नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष श्री. प्रकाश जावडेकर ( माझी केंद्रीय मंत्री ) कॉलेज कार्यक्रमाला आले होते त्यावेळी सरांनी केलेले अध्यक्षीय भाषण, त्याचे जावडेकरांनी केलेले कौतुक आज मला आठवले.
आज सोमय्याचे हे तिन्ही जिवलग मित्र देवाघरी नक्कीच एकमेकांना भेटले असतील व त्त्यांच्या गप्पा रंगल्या असतील…
अशा माझ्या रुबाबदार प्राचाऱ्यांना माझी भावपुर्ण श्रद्धांजली 😔🙏
वर्पे परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वराने देवो.
🙏🙏 ओम शांती 🙏🙏




