सातारा येथे संपन्न होत असलेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ‘प्रकाशन कट्ट्यावर’ कवयित्री व गीतकार सुवर्णा पाटुकले (सुकांचन) यांच्या तीन काव्यसंग्रहांचे प्रकाशन
आपली लेखन संस्कृती उन्नत करा :- संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस

सातारा येथे संपन्न होत असलेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ‘प्रकाशन कट्ट्यावर’ कवयित्री व गीतकार सुवर्णा पाटुकले (सुकांचन) यांच्या तीन काव्यसंग्रहांचे प्रकाशन
आपली लेखन संस्कृती उन्नत करा माजी संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस

सातारा येथे संपन्न होत असलेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ‘प्रकाशन कट्ट्यावर’ कवयित्री व गीतकार सुवर्णा पाटुकले (सुकांचन) यांच्या तीन काव्यसंग्रहांचे प्रकाशन मोठ्या उत्साहात पार पडले. माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. यशवंत पाटणे आणि घनश्याम पाटील यांच्या हस्ते हे प्रकाशन करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना डॉ. श्रीपाल सबनीस यांनी लेखकांना मोलाचे मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “आपल्याला जे सुचते आणि जे अनुभव येतात, ते कागदावर उतरवण्याचा प्रयत्न करा. आपली पिढी ते नक्कीच वाचेल. आपली लेखन संस्कृती उन्नत करणे हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे. संस्कृती समृद्ध करण्यासाठी लिहिणे, वाचणे आणि त्याप्रमाणे वागणे गरजेचे आहे. तुम्ही केवळ या कट्ट्यापुरते लेखक नसून, संस्कृतीच्या अनेक शिल्पकारांपैकी एक आहात.”
या सोहळ्यात पाटुकले यांचा ‘सुवर्णशिदोरी’ (चारोळीसंग्रह) तसेच ‘अंतर्मनात माझ्या’ आणि ‘सुवर्णाक्षरे’ हे दोन काव्यसंग्रह प्रकाशित झाले. “माझ्या भूमीत आणि इतक्या मोठ्या व्यासपीठावर पुस्तकांचे प्रकाशन होणे, हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे,” असे मनोगत सुवर्णा पाटुकले यांनी व्यक्त केले.
सुवर्णा पाटुकले गेल्या २८ वर्षांपासून साहित्य क्षेत्रात कार्यरत असून त्यांचे आतापर्यंत नऊ काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. यामध्ये ‘अंतरंग’, ‘प्रेरणा’, ‘कोरं पान’, ‘पंख’, ‘सखी’, ‘सुवर्ण झेप’ यांचा समावेश आहे. त्यांच्या ‘पंख’ या संग्रहास राज्यस्तरीय ‘साहित्यरत्न पुरस्कार’ तर ‘सुवर्ण झेप’ या संग्रहास राठी साहित्य मंडळ मुंबई यांचेकडून ‘साहित्य भूषण सावित्रीबाई फुले पुरस्कार’ प्राप्त झाला आहे. याशिवाय त्यांना २०२४ आणि २०२५ चे अनेक प्रतिष्ठेचे काव्य पुरस्कार मिळाले आहेत.
साहित्यासोबतच त्यांनी चित्रपटसृष्टीतही गीतकार म्हणून ठसा उमटवला आहे. ‘होणार सून मी त्या घरची’ आणि ‘एकता’ या चित्रपटांसह आगामी ‘लाडकी बहीण’ चित्रपटासाठीही त्यांनी गीते लिहिली आहेत. सध्या त्या ‘ग्रंथराज दासबोध’ वर आधारित ‘समास सारकाव्य’ लेखन करत असून भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच, साताराच्या जिल्हाध्यक्ष म्हणूनही त्या कार्यरत आहेत





