जगातील एकमेव गुरु शुक्राचार्य ( शुक्र ग्रह ) मंदिरामध्ये शिवरात्र मोठ्या उत्साह मध्ये संपन्न होणार त्याचबरोबर शुक्राचार्य महाराजांच्या वेबसाईटचं अनावरण करण्यात आले.

जगातील एकमेव गुरु शुक्राचार्य ( शुक्र ग्रह ) मंदिरामध्ये शिवरात्र मोठ्या उत्साह मध्ये संपन्न होणार त्याचबरोबर शुक्राचार्य महाराजांच्या वेबसाईटचं अनावरण करण्यात आले.
जगातील एकमेव गुरु शुक्राचार्य ( शुक्र ग्रह ) मंदिरामध्ये शिवरात्र मोठ्या उत्साह मध्ये संपन्न होणार त्याचबरोबर शुक्राचार्य महाराजांच्या वेबसाईटचं अनावरण करण्यात आले.
हिंदू धर्मात अत्यंत पवित्र समजला जाणारा महाशिवरात्री उत्सव मिती माघ, कृष्ण अयोदशी शके १९४६, बुधवार दि.२६ फेब्रुवारी २०२५ रोजी येत आहे. त्या संदर्भात मंदिराच्या विविध उपक्रमांची व तयारीची माहिती आपण दरवर्षी पत्रकार बंधुंना देत असतो यासाठीच आपणा सर्वांना येथे आमंत्रित केले आहे.
या वर्षी मंदिरामध्ये ऑगस्ट २०२४ रोजी झालेला गुरू शुक्राचार्य महाराजांच्या सुंदर व पवित्र मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा या व्यतिरिक्त मंदिराच्या इतर कामाबरोबरच आज आपल्या साक्षीने राजेंद्र कमलाकर मुळे, रा.पंचवटी, नाशिक यांनी लिहीलेले शुक्राचार्य स्तवन या पुस्तीकेबरोबरच ओंकार बाळासाहेब आव्हाड यांनी संकलीत केलेले हिन्दीतील श्री शुक्र नित्य सेवा हे पुस्तक व त्यांनी तयार केलेली गुरू शुक्राचार्य महाराज मंदिराची वेबसाईट www.gurushukracharyamandir.com या वेबसाईचे लाँचींग व बाळासाहेब म्हाळुजी आव्हाड लिखीत शुक्रतीर्थ या मराठी पुस्तकाच्या नुतन सुधारीत आवृत्तीचे प्रकाशन शशिकांत वांद्रे, प्रसिध्द वास्तूतज्ञ, नाशिक व मंगेशराव पाटील साहेब, माजी नगराध्यक्ष, कोपरगांव नगरपालिका यांचे शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी डॉ. राजेंद्र कमलाकर मुळे, मनिष गोसावी, ज्योतिषाचार्य, ओंकार बाळासाहेब आव्हाड, शशिकांत वांद्रे व मंगेशराव पाटील, माजी नगराध्यक्ष, यांचा सन्मान मंदिर प्रशासनातर्फे करण्यात आला.
🌳 जय गोदामाई जय त्र्यंबकराज जय शुक्राचार्य 💧
त्याचबरोबर सध्या प्रयागराज येथे सुरू असलेला १४४ वर्षानंतर आलेला महाकुंभनिमित्त व महाशिवरात्रीच्या दिवशी असलेले शेवटची पवित्र स्नानाची पर्वणी लक्षात घेता मंदिरामध्ये होणान्या गर्दीचे नियोजन मंदिराची सजावट, मंदिरामध्ये होणान्या पुजा व या पवित्र पर्वकाळानिमित्त भक्तांना अभिषेक करता यावा यासाठी प्रशासनाने नाममात्र दरात दिवसभर सामुदायीक अभिषेकाची सोय केलेली आहे. यासाठी लागणारे सर्व साहित्य मंदिर प्रशासनामार्फत दिले जाणार आहे.
मंदिरातील शिवपिंडीस चांदीचा मुलामा देण्यासाठी आपण भक्तांना आवाहन करीत असतो, त्याला प्रतिसाद म्हणून कालच कोपरगांव येधील प्रसिध्द व्यापारी के. मोहनशेठ झंवर यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांच्या पत्नी श्रीमती सुमनताई दांवर व परिवारातर्फे सव्वा किलो चांदी शुक्राचार्य महाराजांच्या चरणी अर्पण केली आहे.
महाशिवरात्री उत्सवानंतर येणाऱ्या रविवार दि.२ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ८.०० वाजता सर्व शुक्रभक्त व शिवभक्तांसाठी महाप्रसादाचे (भंडारा) आयोजन धरमवीर अजावाल, सुपुत्र लाला दुर्गादासची मित्तल, रा. संभाजीनगर यांच्यातर्फे आयोजित केला आहे.
सदर पत्रकार परिषदेसाठी ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड, अॅड. संजीव कुलकर्णी, अॅड. गजानन कोन्हाळकर, सुहास कुलकर्णी, हेमंत पटवर्धन, सचिन परदेशी, प्रसाद पन्हे, संजय वडांगळे, बाळासाहेब लकारे, सुजित वरस्तेडे, विलास आव्हाड, दत्तात्रय सावंत, महेंद्र नाईकवाडे, राजेंद्र (मुन्ना) आव्हाड, बाळासाहेब गाडे, विजयराव रोहम, विलास आव्हाड, दिलीपराव सांगळे, विकास शर्मा, भागचंद रूईकर, मधुकर साखरे, गोदामाई प्रतिष्ठान ट्रस्टचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे, अरूण जोशी, विशाल राऊत व राजाराम पावरा नितीन जोशी राकेश भणगे गुरुजी आदी उपस्थित होते.
जय गोदामाई जय त्र्यंबकराज जय शुक्राचार्य