साईभक्तांचे हरवलेले मंगळसूत्र परत मिळाल्याने साईबाबा वरील विश्वास अधिक दृढ झाला
साईभक्तांचे हरवलेले मंगळसूत्र परत मिळाल्याने साईबाबा वरील विश्वास अधिक दृढ झाला
शिर्डी :- प्रतिनिधी
आज श्री साईबाबा मंदिरात कोईम्बतूर येथील साईभक्त श्रीमती एस. गोपीनाथ यांना मध्यान्ह आरती नंतर दीक्षित वाडा जवळ एक सोन्याचे मंगळसूत्र सापडले. तेथे त्यांनी चौकशी केली असता, त्यांना एका भक्ताने संरक्षण ऑफिस ला जमा करायला सांगितले. सोन्याची मंगळसूत्र चे वजन 13 ग्रॅम ( किंमत 97,500 ) होते. मंगळसूत्र जमा केलेनंतर थोड्याच वेळाने श्रीमती ए. सत्या रा. तिरुपती हे मंगळसूत्र हरविल्याची तक्रार करायला ऑफिस आले होते. त्यांना सदर चे मंगळसूत्र ची ओळख पटवून परत दिले. श्रीमती एस. गोपीनाथ यांचा मुलगा शिकायला ब्रिटन ला जात असल्याकारणाने आज साईबाबांचे दर्शन घेणेकरिता ते आले होते. त्यांच्या प्रामाणिकपणा निश्चित च त्यांच्या मुलाच्या उज्ज्वल भविष्य घडवेल असा विश्वास व्यक्त करून त्यांचा सत्कार केला. आज जवळपास एक लाख रु किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र परत मिळाल्याने श्रीमती ए.सत्या यांचा देखील साईबाबांवरील विश्वास अधिक दृढ झाला.
श्री साईबाबा संस्थानचे मुख्य संरक्षण अधिकारी पीएसआय रोहिदास माळी यांनी साईबाबांचे सत्कार केला