रघु ३५० सिनेमाच्या टीमने घेतले गुरु शुक्राचार्य महाराजांचे दर्शन
रघु ३५० सिनेमाच्या टीमने घेतले गुरु शुक्राचार्य महाराजांचे दर्शन
कोपरगाव :- प्रतिनिधी
जगप्रसिद्ध जिथे कोणतेही शुभ कार्य करण्यास मुहूर्त पावा लागत नाही असे एकमेव कोपरगाव शहरातून वाहणाऱ्या पवित्राच्या गोदावरी नदीकिनारी वसलेल्या परम सद्गुरु शुक्राचार्य महाराज मंदिरात आगामी रघु 350 या चित्रपटातील संपूर्ण टीमने भेट देत नव्याने स्थापित झालेल्या महाराजांचे मूर्तीचे मनोभावे दर्शन घेतले.
या प्रसंगी परम सद्गुरु शुक्राचार्य महाराज कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड, मंदिर प्रमुख सचिन परदेशी, उपप्रमुख प्रसाद पर्हे, सदस्य आदिनाथ ढाकणे,मधुकर साखरे, विजय रोहम, बाळासाहेब लकारे, विकास शर्मा, ओमकार आव्हाड आदींनी रघु ३५० या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण गुरु शुक्राचार्य महाराजांच्या मूर्ती समोर करत चित्रपटाचे निर्माते संतोष भोसले, दिग्दर्शक आशिष मडके, कलाकार विजय गीते, आदिती कांबळे, महिमा माहीमोडे, आदिनाथ ढाकणे, प्रज्वल ढाकणे, सचिन भिवरे, नवनाथ टिंगमिरे आदींचा सन्मान केला.
प्रभू 350 हा सिनेमा येत्या 6 सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्र मध्ये प्रदर्शित होणार आहे तरी आपण सर्वांनी हा पिक्चर सिनेमा थेटर मध्ये जाऊन बघावा .