विवाहितेला आत्महत्तेस प्रवृत्त केल्याच्या आरोपातुन साळवे कुटूंबाची निर्दोष मुक्तता :- ऑड.जयंत जोशी

विवाहितेला आत्महत्तेस प्रवृत्त केल्याच्या आरोपातुन साळवे कुटूंबाची निर्दोष मुक्तता :- ऑड.जयंत जोशी
विवाहितेला आत्महत्तेस प्रवृत्त केल्याच्या आरोपातुन साळवे कुटूंबाची निर्दोष मुक्तता :- ऑड.जयंत जोशी
मौजे येसगाव, ता. कोपरगाव येथील पी.एल. साळवे यांना नोकरीला लावण्यासाठी माहेरुन ५ लाख रुपये आणावे म्हणून तिला आत्महत्तेस प्रवृत्त केलेच्या आरोपातुन कोपरगाव जिल्हा सत्र न्यायाधिश यांनी पती पी.एल साळवे व सासु सासरे यांची निर्दोष मुक्तता केली.
आरोपी पती पी.एल. साळवे यांचेमध्ये विवाह झाला होता व विवाहानंतर मुलबाळ होत नव्हते या कारणावरुन सासरकडील लोकांनी मयतास त्रास दिला व पतीला नोकरीस लावण्यास माहेरुन ५ लाख रुपये घेवुन ये या कारणावरुन पत्नीचा शारीरीक व मानसिक छळ केला व त्रासामुळे पत्नीने सन २०२० मध्ये आत्महत्या केली यामध्ये मयताचे वडिल यांनी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये भा.द.वि कलम ४९५ (अ) ३०६ व ३४ प्रमाणे पत्ती पी. एल साळवे व सासु सासरे यांचे विरुद्ध फिर्याद दाखल केली होती व कोपरगाव पोलीसांनी आरोपी विरुद्ध मे. न्यायालयात दोषारोपपत्र हि दाखल केले होते,
सदरील प्रकरणाचे कामी जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये सरकारी वकिलांनी मयताचे वडिल, भाऊ नातेवाईक यांच्या साक्षी नोंदविल्या व तपासी अधिका-यांची साक्ष नोंदवली होती.
आरोपीतर्फे ॲड. जयंत आत्माराम जोशी यांनी मयताचा मृत्यु हा आरोपीचे त्रासाने झालेला नसुन असे कथन केले होते. साक्षीदारांच्या उलट तपासातील विसंगती व केवळ आत्महत्या केली म्हणून केवळ पतीस जबाबदार धरता येणार नाही व त्यासाठी असलेला हेतु सरकारी पक्षाने सिद्ध केला नाही असा युक्तीवाद केला त्या समर्थनार्थ मा. उच्च न्यायालयाच्या अनेक दाखल्यांचा आधार घेतला.
उभय पक्षकांराच्या युक्तीवादानंतर पती पी.एल साळवे व सासु सासरे यांची दोषारोपातुन मुक्तता केली. सदरच्या केसकडे येसगाव, ता. कोपरगाव पंचक्रोशीचे लक्ष लागले होते.
या प्रकरणाचे कामी ad. श्री. जयंत आत्माराम जोशी यांनी प्रकरणाचे कामकाज पाहिले व त्यांना ad. सुजय डि. होन, ॲड. संकेत ए. जानी, ॲड. शाम व्हि, जाधव, ॲड शिवम डि. मोरे, ॲड. तन्मय डि. घोडके यांनी सहकार्य केले.