टेके पाटील ट्रस्टचे सामाजिक कार्य लोकाभिमुख :- अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर

टेके पाटील ट्रस्टचे सामाजिक कार्य लोकाभिमुख :- अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर
कोपरगाव :- प्रतिनिधी
कोपरगाव : शासनाच्या विविध योजना गरजवंत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे व त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी एकाच छताखाली योजनांचे फॉर्म मोफत भरून देणे. त्याचबरोबर पर्यावरण संवर्धनातून गावात वृक्षारोपण करणे व गावच्या सार्वजनिक ठिकाणच्या स्वच्छतेसाठी स्वच्छता अभियान राबविणे. हे सर्व उपक्रम राबविण्याचे राहुल (दादा) मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे सामाजिक कार्य लोकाभिमुख असल्याचे गौरवोद्गार शिर्डीचे अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी काढले.
कोपरगाव तालुक्यातील वारी येथील राहुल (दादा) मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित “मोफत मदत सेवा केंद्रास” शिर्डीचे अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी रविवारी (दि.25) सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्रीकृष्ण पाठक, कोपरगाव तहसीलचे महसूल नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलथे, एकात्मिक महिला व बालविकास प्रकल्पाचे अधिकारी पंडित वाघेरे, तालुका आरोग्य अधिकारी विकास घोलप साहेब उपस्थित होते.
यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य तथा पत्रकार रोहित टेके, प्रथम लोकनियुक्त सरपंच सतीशराव कानडे, ग्रामविकास अधिकारी दिलीपराव वारकर, कामगार तलाठी प्रसाद कदम, ग्रामपंचायत सदस्य योगेश झाल्टे, वारीचे पोस्ट मास्तर संजय कवाडे, सेतू केंद्राचे संचालक रवींद्र टेके, हरीभाऊ टेके, सेवानिवृत्त बँक अधिकारी रावसाहेब जगताप, ज्ञानेश्वर जाधव, दीपक झाल्टे, अजिम शेख, कोतवाल संदीप गायकवाड, राहुल जाधव, शंकर धामणे, स्वप्निल टेके, अमित झाल्टे, भैय्या रोकडे, सक्षम आवारे उपस्थित होते.
शिर्डीचे अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी मोफत मदत सेवा केंद्रास सदिच्छा भेट दिली.
!! जय गोदामाई जय त्र्यंबकराज जय शुक्राचार्य !!