Breaking
ब्रेकिंग

वैभव सूर्यवंशी ने विक्रमांचा पाऊस पडला

0 1 2 4 7 3

वैभव सूर्यवंशीने विक्रमांचा पाऊस पडला

मुंबई : १५वर्षीय वैभव सूर्यवंशीने दोहा इथे सुरू असलेल्या एशिया कप रायझिंग स्टार स्पर्धेत ५३ चेंडूत २०४ धावांची अविश्वसनीय खेळी केली. वैभवने १६ चेंडूत शतक तर २८ चेंडूत शतकाला गवसणी घातली. ५२ चेंडूत त्याने द्विशतक पूर्ण केलं. लिस्ट ए क्रिकेटमधला सगळ्यात वेगवान शतक आणि द्वितकाचा विक्रम आता वैभवाच्या नावावर आहे. या खेळीदरम्यान वैभवने २८ षटकार लगावले. एका खेळीदरम्यान सर्वाधिक षटकारांचा विक्रम वैभवच्या नावावर आहे. वैभवने लिस्ट ए प्रकारात असंख्य विक्रम मोडले आणि नवे प्रस्थापित केले.

लिस्ट ए प्रकार म्हणजे नेमकं काय?
लिस्ट ए म्हणजे मर्यादित षटकांचे सामने. सर्वसाधारणपणे दिवसभरात संपणाऱ्या सामन्यांचा लिस्ट ए मध्ये अंतर्भाव केला जातो. लिस्ट ए सामने ठराविक षटकांचे असतात. ते कृत्रिम प्रकाशात खेळवले जाऊ शकतात. लिस्ट ए सामन्यांमध्ये आंतरराष्ट्रीय वनडे सामन्यांसह डोमेस्टिक स्तरावरील एकदिवसीय सामन्यांचा समावेश होतो.

लिस्ट ए आणि फर्स्टक्लास सामने वेगळे असतात का?
होय. फर्स्ट क्लास श्रेणीचे सामने अनेक दिवसीय असतात. यामध्ये कसोटी तसंच रणजी करंडक स्पर्धेच्या सामन्यांचा समावेश होतो. या सामन्यांचा निकाल अनिर्णित तसंच टाय असाही लागू शकतो.

वैभव खेळत असलेली स्पर्धा नेमकी कशी?
एशिया कप रायझिंग स्टार्स ही आयसीसीतर्फे किंवा दोन देशांदरम्यान आयोजित स्पर्धा नाही. एशियन क्रिकेट काऊंसिल अर्थात आशियाई क्रिकेट परिषदेतर्फे या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. पारंपरिक आशिया चषक स्पर्धेचं आयोजनही याच संघटनेतर्फे केलं जातं. या सामन्यांना आंतरराष्ट्रीय सामन्यांचा दर्जा नाही. या सामन्यांचा समावेश लिस्ट ए श्रेणीत करण्यात येत आहे. भारताने या स्पर्धेसाठी अनुभवी आणि युवा खेळाडूंचं मिश्रण असलेला संघ पाठवला आहे.

भारत, श्रीलंका, पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश या देशांचे अ संघ या स्पर्धेत खेळत आहेत. नेपाळ, युएई, हॉंगकॉंग यांचे राष्ट्रीय संघ स्पर्धेत सहभागी झाले आहेत. या स्पर्धेसाठी पंच आणि सामनाधिकारी यांची नियुक्ती आशियाई क्रिकेट परिषदेतर्फे करण्यात आली आहे.

3/5 - (1 vote)

गोदावरी शुक्राचार्य

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 2 4 7 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे