नातवाने आजी च्या दशक्रिया विधीच्या दिवशी ८५ नारळाचे केले वृक्ष वाटप
नातवाने आजी च्या दशक्रिया विधीच्या दिवशी ८५ नारळाचे केले वृक्ष वाटप
कोपरगाव – प्रतिनिधी
जय भवानी सामाजिक व सांस्कृतिक संस्था पिंपळगाव जलाल व न्यू यंग स्टार क्लब कोपरगाव व आव्हाड परीवाराच्या वतीने आज गं. भा . विठाबाई चिमाजी आव्हाड यांचा आज दशक्रिया विधी पार पडला वयाच्या ८४ व्या वर्षी वृद्धाप काळाने त्यांचे सडक अर्जुनी जिल्हा गोंदिया येथे निधन झाले. कोपरगाव येथील अमरधाम मध्ये दशक्रिया विधी निमित्त त्यांचे परिवारातील सर्व सदस्यांनी कोपरगाव शहरामध्ये एक नवीन पायंडा दशक्रिया विधीनिम्मित पाडला आहे. त्यामध्ये कै. गं. भा. विठाबाई चिमाजी आव्हाड यांचे नातू सेवानिवृत्त सौनिक मेजर समीर आव्हाड, न्यायाधीश डॉ. विक्रम आव्हाड, न्यायाधीश डॉ. संगीता विक्रम आव्हाड यांनी आजीच्या दशक्रिया विधीनिमित्त त्यांच्या वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झालं याचाच औचित्य साधून उन्हामुळे होणारा त्रास निसर्गाची होणारी हानी वाढते प्रदूषण याला आळा बसावा या उद्देशाने न्यायाधीश डॉ. विक्रम आव्हान व न्यायाधीश डॉ. संगीता विक्रम आव्हाड यांच्या संकल्पनेतून उन्हाळ्यामध्ये होणारी जीवाची लाही लाही बघता राष्ट्रीय विधी सेवा निमित्त आजीच्या दशक्रिया विधी मध्ये 85 कल्पवृक्ष म्हणजेच नारळाची झाड वाटप करून त्या सोबत त्याची जोपासना करण्यासाठी मित्रपरिवार व नातेवाईकांना सांगितले. त्याचबरोबर नारळाच्या झाडा सोबतच गांडूळ खत वाटप करून झाडाचे योग्य प्रकारे संगोपन व्हावे या उद्देशाने गांडूळ खत देण्यात आले.पंचक्रोशीतील सर्व स्तरातून या उपक्रमाचं कौतुक होत आहे आज रोजी वसुंधरा वाचवण्याची गरज आहे वाढते, वृक्षतोड प्रदूषण यामुळे जागतिक तापमान वाढीस लागले आहे ते जर तापमान कमी करायचे असेल तर आपन सर्वांना जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून निसर्गाचे संवर्धन करणे काळाची गरज आहे. आपण रोजच उष्माघाताच्या बातम्या ऐकत असतो प्रत्येक जण म्हणतो वृक्ष लागवड झाली पाहिजे संवर्धन जपलं पाहिजे परंतु प्रत्यक्षात कृतीमध्ये कोणीच आणत नाही. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 51 क अन्वये नदी नाले, जंगल, वृक्ष संपदा याचे संरक्षण व संवर्धन करणे प्रत्येक भारतीय नागरिकाचे मूलभूत कर्तव्य आहे त्याचाच एक भाग म्हणून या सुशिक्षित घराण्याने आजीच्या दशक्रिया विधी मध्ये एक चांगला पायंडा पाडून दिला आहे. वृक्ष वाटप करून आजीच्या स्मृती सदैव जिवंत राहावा हाच एक उद्देश असून त्याचबरोबर आपली वसुंधरा कशी टिकेल व सुंदर राहील तिची जोपासना होईल याकडे त्यांनी भर दिला.
तसेच न्यायाधीश डॉ. विक्रम आव्हाड हे गेल्या अठरा वर्षापासून तुळजापूर अक्कलकोट गाणगापूर सायकल यात्रा हा प्रवास करत असतात त्यांच्याबरोबर 40 ते 50 लोकांची सायकल स्वरांची टीम असते.
या सायकल स्वरांच्या माध्यमातून अनेक ठिकाणी नवनवीन उपक्रम राबवून जमिनीचे संवर्धन कसे होईल जागतिक पर्यावरणाला कसा लाभ होईल वृक्ष लागवड जास्तीत जास्त होणे गरजेचे आहे. पाणी आडवा पाणी जिरवा, कोरड्या जागेवरती डोंगराळ माळावरती जंगली बियांची लागवड करणे, स्वच्छता अभियान असो, प्लास्टिक मुक्त शहर असो अशा विविध उपक्रमांना चालना देऊन तरुणांच्या मार्फत हा उपक्रम राबवत असतात. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी न्यायाधीश डॉक्टर संगीता विक्रम आव्हाड यादेखील या उपक्रमामध्ये त्यांच्या खांद्याला खांदा लावून सहकार्य करत असतात. खऱ्या अर्थाने समाजामध्ये अशा गोष्टी रुजणे काळाची गरज आहे. आपला जन्मदिवस असो वा मृत्यू दिवस असो मित्राचा वाढदिवस असो व मृत्यू असो त्या दिवशी त्याचे आठवण राहावी म्हणून आपण प्रत्येकाने एक झाड आपल्या शेतामध्ये घरासमोर जिथे आपल्याला योग्य जागा मिळेल तिथे संवर्धन करणे काळाची गरज आहे, असे महत्त्व सदैव डॉक्टर विक्रम आव्हाड हे पटवून देत असतात.