महिला हा शब्द कोठून आला :- श्रीमती राजश्री पाटील

महिला हा शब्द कोठून आला :- श्रीमती राजश्री पाटील
महिला हा शब्द कोठून आला :- श्रीमती राजश्री पाटील
०७ मे २०२५
महिला या शब्दाबद्दल मी सदैव नाराजी व्यक्त करत आलेले आहे पुरुषाला जर बापई म्हणत नाहीत पुरुष म्हणतात तर महिला हा शब्द कोठून आला माहित नाही स्त्री हा शब्द मला सन्मानजनक वाटत आलेला आहे.मात्र जळी स्थळी काष्टी सगळीकडे महिला हाच शब्द अग्रेसर आहे मी देखील अर्जामध्ये मी महिला अधिकारी असल्याने असे शब्द वापरत असते मी स्त्री अधिकारी असल्याने असे शब्द मी नाही वापरत मग हा शब्द वापरल्यावर आपल्यावर अन्याय झाला वैगेरे भावना बोथट होऊन जातात असे वाटत असो…
स्त्रिया आणि त्यांचा स्वतंत्र रेल्वे मधील डबा खरेतर मला स्त्री पुरुष समानता अनुषंगाने विचार करायला भाग पाडते की कधी कधी केवळ स्त्रियांसाठी असलेल्या डब्यात प्रचंड गर्दी असेल तर मग आपण सामान्य डबा जिथे स्त्री पुरुष दोघे प्रवास करू शकतात त्या डब्याने जायला काही हरकत आहे का ? मी काल तुरळक गर्दी असलेल्या डब्यात जाऊन बसले जिथे पुरुष होते मला स्टॉप बद्दल काही शंका आल्यावर मी माझ्या समोर बसलेल्या साधारण पन्नाशीच्या पुरुषाला विचारल्यावर त्यांनी माझ्या शंकेचे निरसन तर केलेच मात्र रेल्वे मधील हार्बर,सेंट्रल लाइन त्यावरील ठिकाणे त्या अनुषंगाने असलेले ऍप काही ठिकाणांना ते नाव का पडले सारखी इत्यंभू माहिती देखील मला दिली तेच जर एखाद्या लेडीजला विचारले असते तर तिने आपल्या कानातील ब्लूटूथ काढून त्या ठिकाणची माहिती एखाद दुसऱ्या शब्दात दिली असती किंवा नसती देखील दिली याचा अर्थ पुरुषांचे स्त्रियांकडे लक्ष असते ते लक्ष देतात असा अर्थ न घेता पुरुष अनोळखी स्त्रियांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकतात आणि अनोळखी स्त्रीयांना मदत करण्यासाठी तत्परता दाखवतात जेवढी तत्परता स्त्रिया दाखवत नाहीत तर त्या आत्ममग्न असतात.
पण तरीही ही आत्ममग्नता येण्यासाठी तिच्यावर तिच्या कुटुंबाची असलेली जबाबदारी हे कारण असल्याने ती इतर आजुबाजूच्या लोकांबद्दल खूप कमी आस्था बाळगून असते .ट्रेन मध्ये असलेल्या महिलांच्या डब्यात किती हरेक प्रकारच्या या रणरागिणी आपल्या आपल्या लढाई लढत असतात.कोणी डोळे मिटून झोपी गेलेल्या असतात,कोणी फोनवर सतत बोलत असतात ,कोणी भाजी निवडत असतात,कोणी ट्रेनमध्ये काही विकायला आल्यावर घेत असतात ,कोणी पुस्तक वाचत असतात,कोणी केस नीट करत असतात तर कोणी reels बघत असतात मला वाटत या मिळून साऱ्याजणी एकत्र प्रवास करतात मात्र त्या एक एकट्या असतात स्वतःची लढाई लढत असतात ही ट्रेन अशा किती सुख दुःखाची अगणिक वेगवेगळ्या क्षणांची साक्षीदार असते ही ट्रेन हा महिलांचा डबा अशा रंग रंगेबी क्षणांचा साक्षीदार असतो अखंड प्रवासात असतो .
#मुंबई_डायरी
#मुंबई_दिनांक
#महिलांचा_डबा #कोलाहल
#हालचाल
#गर्दी
#आनंद
#अस्वस्थता