संतश्रेष्ठ भगवानबाबा व वामनभाऊ महाराज यांची सुयक्त पुण्यतिथी कोपरगाव आगार मध्ये उत्सहात साजरी

संतश्रेष्ठ भगवानबाबा व वामनभाऊ महाराज यांची सुयक्त पुण्यतिथी कोपरगाव आगार येथे उत्सहात साजरी
संतश्रेष्ठ भगवानबाबा व वामनभाऊ महाराज यांची सुयक्त पुण्यतिथी कोपरगाव आगार येथे उत्सहात साजरी
कोपरगाव :- आदिनाथ गो ढाकणे
आज दि 21/1/2025 रोजी कोपरगाव आगारामध्ये भगवानबाबा व वामनभाऊ यांची सुयक्त पुण्यतिथी मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली या प्रसंगी आगारातील कर्मचारी, अधिकारी उपस्तीथ होते. या प्रसंगी बस स्टॅन्ड प्रमुख (ATS)दिघे साहेब, खेमणार साहेब (TI), गवळी मॅडम (accoutant ), रवीभाऊ गिरमे (TC), तसेच कोपरगाव शहरातील समाज बांधव, सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अजय गर्जे, गोदामाई प्रतिष्ठान ट्रस्ट चे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे शिवसेनेचे भरतभाऊ मोरे, जगन्नाथ थोरे ,भाऊसाहेब भाबड, विजय सांगळे अविनाश पाठक, दहिफळे सर, आव्हाड , ऑड निलेश कातकडे ,ऑड संदीप सांगळे,केकाण, सुमित बिडवे, अनिल भाबड, संजीव गाडे, सोमनाथ सांगळे किरण आव्हाड प्रज्वल ढाकणे सह समाज बांधव कुटुंबासह हजर होते.
या प्रसंगी डॉक्टर गर्जे यांनी भगवान बाबा यांनी समाजाला दिलेली शिकवण *” एकर विका पण मुले शिकवा “* या उपदेशाचा किती फायदा समाजाला झाला आहे त्यामुळे सर्व विभागात मुले शिकून मोठ्या पदावर पोहचली, हे बाबांचे विचार त्याकाळी किती महत्वाचे होते हे याप्रसंगी नमूद केले. भरतभाऊ मोरे यांनी सुध्या बाबांचे विचार किती श्रेष्ठ होते हे सांगितले. भाऊसाहेब भाबड यांनी याप्रसंगी सांगितले कि सर्व समाज बांधव st कर्मचारी इतक्या बिझी असताना सुद्धा बाबांची पुण्यतिथी तीन वर्षांपासून साजरी करतात याचे कौतुक करत धन्यवाद दिले. या प्रसंगी थोरे महाराज व त्यांची टीम यांनी खूप चांगल्या पद्धतीने भजन गायन केले. या भक्तिमय कार्यक्रमात सर्वजण भगवान बाबा व वामनभाऊ महाराज यांच्या भक्तीत तल्लीन झाले होते. या प्रसगी सर्वांनी एकत्र येऊन खूप सहकार्य केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सर्वांनी सहकार्य केल्यामुळे कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने पार पडला.
या कार्यक्रमासाठी नवनाथ खेडकर, ब्रह्मदेव बडे ,पांडुरंग गरकल ,अनिल भाबड ,बापू गर्जे, संतोष दौंड, शंकर नागरे , मुन्ना आव्हाड आणि समाज बांधव यांनी कार्यक्रम यशस्वी पार पडला.
????जय भगवान बाबा. जय वामन भाऊ महाराज ????