Breaking
ब्रेकिंग

अस्थिविकार तपासणी शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद

0 1 1 3 0 8

अस्थिविकार तपासणी शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद

कोपरगाव- कोपरगाव मध्ये नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेली गोदामाई प्रतिष्ठान ट्रस्ट आणि पुणे येथील प्रसिद्ध संचेती हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने संचेती हॉस्पिटल येथील तज्ञ डॉक्टर्स द्वारा मंगळवार दि १४ एप्रिल रोजी आयोजित मोफत अस्थिविकार तपासणी शिबिरात २०० हुन अधिकच्या अस्थिविकारग्रस्तांनी लाभ घेतला.


कोपरगाव शहरातील नामदेवराव परजणे पाटील लॉ कॉलेज येथे आयोजित केलेल्या शिबिराचे उद्घाटन क्रेडाईचे अध्यक्ष राजेश ठोळे यांच्या अध्यक्षतेखाली वैद्यकीय शैक्षणिक औषध विभाग मंत्रालय महाराष्ट्र शासन मुंबईचे उपसचिव संदीप ढाकणे व मराठी सिने अभिनेते चिन्मय उदगीरकर यांच्या शुभहस्ते झाले.

याप्रसंगी कोपरगाव तालुका विद्यार्थी सहाय्यक समितीचे डॉ हिरालाल महानुभाव, संचेती हॉस्पिटल पुणे जनरल मॅनेजर डॉ राहुल चोबे, कोपरगाव शहर पोलीस उपनिरीक्षक दीपक रोठे, संदीप सोने, मंत्रालय कक्ष अधिकारी जालिंदर आव्हाड, सोमैय्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजय ठाणगे, नगरसेवक रवींद्र कथले, सामाजिक कार्यकर्ते विनोद राक्षे, डॉ चंद्रशेखर आव्हाड, प्रदीप गुरुली, अनिल भाबड, विजय सांगळे नारायण अग्रवाल,सोमनाथ लोहकरे, सिद्धार्थ शेळके,नितेश बोरुडे, अल्ताफ शेख, बाळासाहेब वायखेंडे, दिलिप कोल्हे, राहुल कवरे,किरण आव्हाड,डॉ केदार आहेर, डॉ गोपाल देवठाणे, अजिनाथ रोठे आदींच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

 

या शिबिरात बी एम डी टेस्ट सांधेदुखी, संधिवात, सांधे प्रत्यारोपण,कंबरदुखी, हाता पायांना मुंग्या येणे,फ्रोजन शोल्डर, मणक्याचे जुने आजार, डायबेटिक निरोपॅथी, सायटिका पेन, लिंगामेट इन्जूरी, टेनिस एलबो तसेच रिप्लेसमेंट नंतरचे उपचार या अस्थिरोग विकार ग्रस्तांची तपासणी केली तर शिबिर यशस्वीतेसाठी गोदामाई प्रतिष्ठान ट्रकचे आदिनाथ ढाकणे, प्रा जनार्दन सुपेकर, योग गुरु प्रज्वल ढाकणे विनायक सोनवणे केसरबाई महानुभव नर्सिंग कॉलेजचा कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी आदींनी अथक परिश्रम घेतले

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

गोदावरी शुक्राचार्य

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 3 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे