कोपरगाव क्रेडाईचे अध्यक्ष ठोळे, सचिव भारती व पदाधिकाऱ्यांनी स्वीकारला पदभार

कोपरगाव क्रेडाईचे अध्यक्ष ठोळे, सचिव भारती व पदाधिकाऱ्यांनी स्वीकारला पदभार
कोपरगाव क्रेडाईचे अध्यक्ष ठोळे, सचिव भारती व पदाधिकाऱ्यांनी स्वीकारला पदभार
कोपरगाव- बांधकाम व्यवसायिकांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या राज्यस्तरीय क्रेडाई या संघटनेच्या सोमवार दि २८ एप्रिल रोजी झालेल्या कार्यक्रमात कोपरगाव शिर्डीच्या २०२५ ते २०२७ या कालावधी करिता अध्यक्ष प्रसिद्ध उद्योगपती व बांधकाम व्यवसायिक राजेश ठोळे,सचिव राहुल भारती, उपाध्यक्ष के.एन असणे, प्रसाद नाईक, सहसचिव दीपक जाधव, सिद्धेश कपिले, कोषाध्यक्ष हिरेन पापडेजा, सहकोषाध्यक्ष स्वप्निल जाधव तर सदस्य दिणार कुदळे, चंद्रकांत कौले, सचिन बोरावके, मनीष फुलपगर, नरेश गानोरकर, संदीप राहतेकर,याकुब शेख, रवींद्र डाके, जय बोरा, विक्रांत सोनवणे, ओंकार भट्टड, प्रणित कातकडे, योगेश मोरे, अमोल आसने,विलास खोंड, प्रदीप मुंदडा, अमोल भाकरे, नितीन पवार, मनोज अग्रवाल, कैलास भुतडा, विजय कुहिले, यश विसपुते या सर्वांनी आपला पदभार स्वीकारत कामाला सुरुवात केली आहे.
याप्रसंगी क्रेडाईचे राज्याचे सचिव आशिष पोखरणा, राज्य उपाध्यक्ष सुनील कोतवाल, आमदार आशुतोष काळे, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे, गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश परजणे, पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने, नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुहास जगताप, ग्रामीण पोलीस निरीक्षक संदीप कोळी, अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान, निवासी नायब तहसीलदार प्रफुल्लीता सातपुते, नगरपालिकेच्या रचनाकार अश्विनी पिंगळे, आदि वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर बांधकाम व्यवसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक संघटनेचे मावळते अध्यक्ष प्रसाद नाईक यांनी करताना संघटनेने आतापर्यंत रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण, नवीन बांधकाम व्यवसायिकांना सेमिनार, मतदान जनजागृती आदि राबविलेल्या
सामाजिक उपक्रमाची माहिती देत पाणी बचतीच्या दृष्टीने भविष्यात प्रसिद्ध जलतज्ञ डॉ राजेंद्र सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली रेन वॉटर हार्वेस्टिंग या प्रकल्पावर भर देणारे असल्याचे सांगितले.
नूतन राजेश अध्यक्ष ठोळे यांनी विकासाच्या दृष्टीने कोपरगाव शहर सर्व सोयीनीयुक्त असून शहरात क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या मोठ्या संधी उपलब्ध असून या संधीचे सोनं करत आम्ही सर्व आमदार आशुतोष काळे, युवा नेते कोल्हे तसेच राजेशआबा यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी व सर्वांना परवडेल अशा वाजवी किमतीत स्वतःच्या हक्काचे मालकीचे सर्व सोयीनियुक्त घर देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत ठोळे यांनी एक आगळेवेगळे ‘कोपरगाव नेक्स्ट’ या नावाचे संघटनेचे व्हिजिन सर्वांसमोर सादर करत त्यातून नवउद्योजकांना मोठया प्रमाणात व्यवसाय व रोजगार स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात असे सांगत येणाऱ्या काळात सर्वांच्या मार्गदर्शनाखाली संघटना अधिकाधिक सामाजपयोगी उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले.
सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी संघटनेच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले तर उपस्थित सर्व मान्यवरांनी क्रेडाईच्या नूतन कार्यकारणीने पदभार हाती घेतल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.तर उपस्थित मान्यवरांचे आभार सचिव राहुल भारती यांनी व्यक्त केले.