Breaking
ब्रेकिंग

स्नेहालय उडान प्रकल्पांतर्गत कोपरगाव तालुक्यात बालविवाह मुक्ती मिशन सप्ताह साजरा 5000 पेक्षा जास्त विद्यार्थी, शिक्षक यांना बालविवाह प्रतिबंधाविषयी जनजागृती

0 0 8 3 2 8

स्नेहालय उडान प्रकल्पांतर्गत कोपरगाव तालुक्यात बालविवाह मुक्ती मिशन सप्ताह साजरा
5000 पेक्षा जास्त विद्यार्थी, शिक्षक यांना बालविवाह प्रतिबंधाविषयी जनजागृती

स्नेहालय उडान प्रकल्पांतर्गत कोपरगाव तालुक्यात बालविवाह मुक्ती मिशन सप्ताह साजरा
5000 पेक्षा जास्त विद्यार्थी, शिक्षक यांना बालविवाह प्रतिबंधाविषयी जनजागृती

कोपरगाव, 4 फेब्रुवारी 2025: स्नेहालय उडान प्रकल्प अंतर्गत कोपरगाव तालुक्यात बालविवाह मुक्ती मिशन सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. या अभियानांतर्गत 5000 पेक्षा जास्त विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थांना बालविवाह प्रतिबंधाबाबत जनजागृती करण्यात आली. माझे गाव बालविवाहमुक्त गाव आणि माझी शाळा बालविवाहमुक्त शाळा या उपक्रमांचा तालुक्यात शुभारंभ झाला असून प्रत्येक गावात जाऊन गावकऱ्यांशी संवाद साधून बालविवाहाचे दुष्परिणाम पटवून देण्याचे काम यशस्वीपणे सुरू आहे.

बालविवाहमुक्त कोपरगावसाठी व्यापक जनजागृती
या मोहिमेअंतर्गत गावोगावी जाऊन ग्राम बाल संरक्षण समिती, ग्रामसेवक, बालविवाह प्रतिबंध अधिकारी यांना पुढील काळात प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये गावसभेत बालविवाहमुक्त गावाचा संकल्प करून हे अभियान राबवले जाणार आहे.
तसेच, कोपरगाव तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी श्रीमती शबाना शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना बालविवाह प्रतिबंधक कायदा, बालकांचे हक्क आणि मोबाईल, सोशल मीडियाच्या दुरुपयोगाचे दुष्परिणाम याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

ऊसतोड कामगार कुटुंबांपर्यंत पोहोचले अभियान
कोपरगाव तालुक्यातील ऊसतोड कामगार कुटुंबांपर्यंतही या जनजागृतीचा प्रभाव पोहोचवला गेला. ऊसतोड कामगार कुटुंबांमध्ये जाऊन त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.

या मोहिमेत डॉ.अशोक गावित्रे, स्नेहालयचे वैभव शेलार, उडान प्रकल्पातील स्वयंसेवक आकाश पंडोरे, गोदामाई प्रतिष्ठानचे ट्रस्ट चे सचिव प्रज्वल ढाकणे आणि आकाश खंडागळे यांनी विशेष योगदान दिले. दोन दिवसांच्या अथक प्रयत्नांतर्गत शेकडो विद्यार्थी आणि पालकांपर्यंत बालविवाह प्रतिबंधाचा संदेश पोहोचवून बालविवाहमुक्त कोपरगावच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.

आपला नम्र
प्रविण कदम
9011026495

 

 

आई गोदावरी स्वच्छता अभियानाचा 300 वा आठवडा 
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

गोदावरी शुक्राचार्य

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 8 3 2 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे