“ अमरधामातील राख… आणि तिच्यातून उगवलेली जिवंत ज्योत!”

“ अमरधामातील राख… आणि तिच्यातून उगवलेली जिवंत ज्योत!”
स्मशान
जिथे शांततेलाही आवाज असतो,
आणि *राखेतूनही* कहाण्या उसळत असतात…
त्या *राखेच्या* वलयांतून चालताना
*अण्णाभाऊ साठे* यांची *स्मशानातील सोनं* ही कथा आठवते
जिथे जगण्यासाठी *माणूस* मृत्यूशीही हातमिळवणी करतो…
आणि त्याच वेळी वेदना
मनाच्या कपारीत साचू लागतात…
कारण
हे फक्त *स्मशान* नाही…
हे जगण्याच्या *कटू* सत्याचं *विद्यापीठ* आहे…
आणि त्या *विद्यापीठात*
*कोपरगावच्या* *अमरधाम* मध्ये
*दफन विधीचे* कार्य करणारी
एक स्त्री उभी आहे
*राधाबाई शिवराम जाधव!*
*ती* फक्त नाव नाही…
*ती* राखेतून जन्मलेली एक ज्वाला आहे…
पतीच्या शरीराला आलेला *पॅरालिसिसचा* घाव,
घरातलं निर्विकार शांत दुःख,
आणि *उद्याचा* *अंधारलेला प्रश्न*
या सगळ्यांवर मात करत
*ती* पुढे सरसावली…
ना हातात *पदवी*
ना कुठली *ओळख*
पण हृदयात धगधगत होती
*कर्तव्याची* निखाऱ्यासारखी जिद्द!
*जिथे* आपण…
*दिवसा* सुद्धा पाऊल ठेवायला कचरतो,
*तिथे* *ती*
*रात्रीच्या* गडद शांततेतही ठाम उभी असते…
*जिथे*
*अश्रूंचा महापूर* उसळतो,
*तिथे ती*
*धीराचा काठ* बनते…
*जिथे*
अंतिम निरोपाची *वेदना उसवते,*
*तिथे ती*
*संस्कारांचा* शेवटचा हात धरते…
पण…
त्या धगधगत्या *चितेजवळ उभी* राहून
*ती* जेव्हा बोलू लागली
तेव्हा *शब्द* नव्हते,
तर काळजाला चिरणारे अनुभव होते…
“ द्या अजून चार लाकडे … म्हणजे तेवढ्यात भागेल…”
कोणीतरी सहज म्हणतं…
आणि लगेचच *दुसरा* आवाज
“ *अजून किती वेळ लागेल…?”*
हे ऐकताना
*राधाबाईंच्या* डोळ्यांतली वेदना
जणू राखेपेक्षा अधिक जळत होती…
त्या सांगत होत्या..
“ *लोकांना इथेही घाई असते…*
काही तर *अर्धवट* अवस्थेतच सोडून जातात…
आणि काही…
*मोबाईलमध्येच* गुंतलेले असतात…!”
काळ विचित्र आलाय…
जिथे *मृत्यूही* थांबतो,
पण *माणसाची घाई* थांबत नाही…
त्या क्षणी
*कुसुमाग्रज* यांच्या शब्दांची सावली
मनावर अलगद पडते
“ *जगण्याचा अर्थ कधी कळलाच नाही…”*
आणि मग
*भाऊसाहेब पाटणकर* यांच्या ओळी
*अंतर्मनाला विदीर्ण* करतात
“जन्मातही मी कधी नव्हते माझे तोंड लपवले,
मृत्यूनंतर कळले मला वस्त्रांनी मुख माझे का झाकले…”
या ओळी…
आणि *राधाबाईंचं* जगणं
दोन्ही एकाच *वेदनेच्या धाग्याने* विणलेले…
आपण मात्र…
*जिवंत माणसांकडे* दुर्लक्ष करून
*अहंकाराच्या* *सावलीत जगतो,*
आणि
*दुःखावरही वेळेचा हिशोब मांडतो…*
पण
त्या सगळ्यांच्या पलीकडे
अमरधामात
*एक स्त्री*
राख उचलताना
स्वतःचं आयुष्य पुन्हा पुन्हा पेटवत असते…
*ती*
मृत्यूची सेवक नाही,
तर जीवनाची *शेवटची प्रहरी* आहे!
आणि…
या सगळ्या *ज्वालांच्या, राखेच्या* आणि अश्रूंच्या मध्ये
एक कटू सत्य शांतपणे उभं आहे
ही *रणरागिणी*
ठेकेदारी पद्धतीने,
तुटपुज्या *मानधनावर*
*मृत्यूशी झुंज* देत जगते आहे…
ज्यांच्या *प्रियजनांना* ती शेवटचा निरोप *सन्मानाने* देते,
त्याच हातांना
आपण कधी *आधाराचा स्पर्श* दिलाय का…?
आज
किमान त्या अंतिम क्षणी तरी,
आपणही *माणूस* होऊ या…
तिच्या हातात
फक्त लाकडं नव्हे,
तर आपली थोडीशी *मदत* , आपुलकी, आणि *कृतज्ञतेची* *ऊब* ठेवू या…
कारण
ती प्रत्येक चितेसोबत
आपल्यासाठी *कर्तव्याची ज्योत* पेटवत असते…
आणि आपण…
किमान तिच्यासाठी
एक दिवा तरी लावू या…!
(अक्षय जाधव, मुलगा,8308672594)
गोरे सर
कोपरगाव
९८५० ६१३ ६१२




